Saturday, 21 June 2014

खूप जास्त चांगल असण हा सुद्धा एक दुर्गुण आहे …. 
दर्शन ...
कधी कधी तुम्ही किती ही उड्या मारा तुमचा नशीब तुम्हाला तिथच नेउन फेकत जिथं तुमची लायकी आहे
मग परत संघर्ष करा
कारण नशिबाला काही अधिकार नाही तुमची लायकी ठरवायचा …….
दर्शन ...
 — 

Tuesday, 10 June 2014

मराठी बोल्यानी किवा मराठी माणसाच्या जवळ गेल्यानी T. B. होत नाही  …… 
मराठीत बोलI बिन्धास्त … 
दर्शन …
"Freelance photographer" म्हणजे डोंबाऱ्या चा खेळ जिकडे तमाशा असेल तिकडे तंबू ठोकायचा …. 
दर्शन ...
 
" down to earth " पण असा नको व्हायला कि ..... 
लोकांना तुमची किमतच कळणार नाही 
अन ते तुम्हाला पार मातीत मिसळतील ….

दर्शन
आज काल प्रेमाला फालतुगीरी
अन फालतुगीरी ला प्रेम म्हणतात …

typical rotlu love quotes .....
 —

Thursday, 29 May 2014

म्हणतात तुम्हाला हव ते मिळत …
पण साला कधी कधी " काय हवय ? " तेच शोधता शोधता खूप वेळ निघून जातो …:p

अने वाली बारीश…

अने वाली बारीश…  
हम तो बस इतना चाहते हे कि हर साल  " सुखें जिस्म को भिगाने वाले बारीश के कूच बुंदे ईस बार सुखें दिलो को भिग दे"
काही गोष्टी निर्जीव असतात तेच चांगल…
कमीत कमी त्या जिवंत पणी मेल्याच सोंग तर करत नाही.......
"बुंद,बुंद से घट भरता हे","थेंबे,थेंबे तळे साठे" ,
पण "समुद्र" भरायला धुवाधार पावसाचीच गरज असते …

Tuesday, 11 February 2014

शेरनी ….


गावची यात्रा पाहायला गेलो होतो २,३ वर्षान पूर्वी …जुन्नर,खामुंडी … 
यात्रे ला सर्व मंडळी येतात कुठंही असो गावची यात्रा म्हंटल कि सगळे २ तास का होईना येउन जाणार ,पण मी पहिल्यांदाच गेलो होतो गावची यात्रा खरच एक धमाल… रात्र भर जागून बघितलेला तमाशा ,दुसऱ्या दिवशी तोच तमाशा बिन मेकअप करतात त्याला हजेरी म्हणतात … अन बरच काही 
अजून एक कार्यक्रम असतो तो म्हणजे शेरनी चा … त्या दिवशी मी पण गेलो शेरनी म्हणजे नक्की काय असत ते बघायला … तेव्हा कळल लोक दरवर्षी खंडोबाला गुळाचा नवस करतात अन नवस पुरा झाला कि मग नवस प्रमाणे गुळ वाटतात पहिला खंडोबाला अन मग तोच गुळ गावातल्या शेजारी,लहान मुल,मित्र मंडळीनी वाटला जातो लोक केलो ,केलो,गूळ वाटतात,कुणी ५ केलो ची ढेप कुणी १० किलो ची ढेप अस गुळ वाटून लोकांच तोंन्ड गोड करण्याची प्रथाच… अगदी भर,भरू न एक मेकांना गुळ वाटला जातो
मंदिरचा भला मोठा परिसर ,प्रचंड गर्दी बायका माणस हातात,ताटात गुळ घेऊन गर्दी करत होती,
मी जरा लांब उभं रहान पसंद केल… त्या गर्दीत एक वयस्कर आजीबाई ला बघत हाताची कडी मोडी झालेली ,डोळे पानावलेले,केवीलवाना चेहरा , चेहऱ्या वर मोजता येणार नाही इतक्या सुरकुत्या,कंबरड वाकलेला ८०/९० नक्की असावी संपूर्ण म्हतारी बसेल इतकी मोठी एक गोनी हातात घेऊन बाहेर उभी होती,… प्रचंड गर्दी चेंगरा चेंगरी अन त्यात हि म्हतारी उभी …. कुणा साठी देव जाणो तिच्या नातवासाठी कि वर्ष भर घरी गुळ आणायला लागू नये म्हणून बिचारी जीवाचा आटा पिटा करून केवील वाण्या आवाजात "थोडा गुळ या म्ह्तरिच्य गोणीत बी टाक र भाऊ " करत बोचकं भरायचा प्रयत्न करत होती…मग जवळ जाऊन मी पण एक मुठ गुळ तिच्या बोचक्यात टाकला हातात कॅमेरा  होता लेन्स ची कॅप पडली अन मी कॅप शोधायला म्हणून खाली वाकलो …. अचानक लक्ष गेल म्हतारी ज्या तळमळी नि तिचा बोचक भारतेय ते बोचक तिची ती गोनी खालून  उसवली होती अन त्यातून गुळ खाली सांडत होता कॅप उचली अन तिला जाऊन सांगनार इतक्यात गर्दी लोण्डका आला अन म्हतारी नजरे आड झाली मी ओरडून सांगत होतो आजी तुमचा बोचकं खालून फाटलय पण इतक्या गर्दीत तिला काय ऐकू जाणार ती नजरे पासून लांब होत गेली सांडलेल्या गुळ लोक पायांनी तुडवत जात होते…


DG..